Nojoto: Largest Storytelling Platform

कधीकाळी पावसाच्या थेंबात तुझा सहवास होता वार्‍याच

 कधीकाळी पावसाच्या
थेंबात तुझा सहवास होता
वार्‍याच्या झुळूकेवर
हृदयाचा माझ्या प्रवास होता

पडणार्‍या सरी जणू 
प्रेम होऊन बरसत होत्या 
हलकेच उमलणार्‍या कळ्या 
पावसात पहिल्या भिजत होत्या 

ओल्या मातीचा गंध लेऊन 
वाराही इथला गंधीत व्हायचा 
इंद्रधनूच्या सप्तरंगाने त्या 
आसमंतही सारा रंगीत व्हायचा 

प्रत्येक पाऊस पुन्हा नव्याने 
आजही त्या क्षणांना आठवून देतो 
भेटीगाठी दिन रातीच्या 
आजही मनात या पाठवून देतो

©कविराज धनंजय
  #पाऊस #आठवण 
#कविराज_धनंजय 
#raindrops