"नको देवा मला ही पावसाची सरं... येता पावसाची सर माझी होई तारांबळ घरावर छप्पर असून नसलेले आहे घरामंदी पाणी साचून भांडे घराबाहेर वाहे एगळाच हाय देवा तुझा न्यावं आरं जित्या परी मेल्या धडाला ज्यादा भाव आता व्हत नही, सहीनं सोसू कुठवरं नको देवा मला ही पावसाची सरं... या या पावसानं पोरीचं लगीन मोडलं मह्या सर्जा राजाला बजारात धाडलं आरं 'गारा' नही त्वा अंगार बरशिवली व्वा रं तुही किमया पाण्यानं चिंता पेटवली लोकाह्यचं सोड, तूच नही आमच्या भल्यावरं नको देवा मला ही पावसाची सर... मागचाच दुसकाळ फिटता, फिटना आन, 'गारपीटीनं' आणला तेरावा महीना आम्हा शेतकऱ्यांवरच नजर तुही तिरकी चुकून माकून एखादा सावकार ही धर की डोंगर 'खडा' वाटतो ह्यांच्या कर्जा म्होरं नको देवा मला ही पावसाची सरं... भाकरीतला शेतकरी दिसतो का कोणाला पण शेतकऱ्याची भाकर दिसती देवाला शेतकरी म्हणून जलमलो हाच माझा गुन्हा साकडं घालतो तुला, जलमा घालू नको पुन्हा आमच्या मारणाचं उगा खापर फुटल तुझ्यावरं नको देवा मला ही पावसाची सरं"... कवितेचं नाव:#गारपीट #2014