Nojoto: Largest Storytelling Platform

जगणं बऱ्याच वर्षात आज वाटली थोडी भीती

जगणं 

बऱ्याच वर्षात आज वाटली थोडी भीती 
             विचारलं मी मनाला कुठे हरवलो मी? 
समोर दिसू लागलं माणसाचं जगणं, 
           दिसू लागलं आजच्या माणसाचं वागणं. 

स्वार्थ आणि अर्थ (पैसा ) होत आहेत मित्र, 
            जगणं हिसकावून घेत आहे काळोख्याची रात्र. 
आळसाने संपून टाकलाय आमच्यामधील संघर्ष, 
          व्हायचे ते आजच होऊ दे, कशाला  उगाच वर्ष.

आयुष्याच्या प्रवाहात वाहत -वाहत गेलो, 
           कळलं नाही आम्हाला कधी समुद्रात आलो. 
वाटलं मग सगळं पाणी, माझंच आहे हे, 
             जिभेने सांगितलं वेड्या, खारट आहे ते. 

जगणं काय असतं विसरलो आहोत आम्ही, 
             आपल्याच माणसाला म्हणतो काय केलं तुम्ही? 
वाटत मग एका क्षणी का होते हार? 
                    आठवतो जोडीचा मित्र तो अहंकार. 

हसत- खेळत माणूस जीवनात मोठा होतो, 
              स्वतःसाठी जगतांना कधी दुसऱ्यासाठी जगतो. 
ज्ञानी माणूस स्वतःहून जग निरखून पाहतो, 
                अज्ञानी माणूस पुढे व्यर्थ होऊन जातो. 

म्हणूनच 
 जगतांना प्रत्येक क्षणी आनंदाने जगा, 
           ईश्वराने जीवन दिलंय पुर्ण विश्व बघा.
सांगता येत नाही उद्या काय होईल, 
               जगण्यासाठी जीव राहील की जाईल? 

मारतावेळी म्हणाल मग, 
या जन्मी मनासारखं जगताच आलं नाही, 
  पुन्हा जन्म होऊ दे, तुझ्याच पोटी आई,तुझ्याच पोटी आई.

                                                      हर्षल दत्तात्रय चौधरी #जगणं
Message-stay safe from corona virus
जगणं 

बऱ्याच वर्षात आज वाटली थोडी भीती 
             विचारलं मी मनाला कुठे हरवलो मी? 
समोर दिसू लागलं माणसाचं जगणं, 
           दिसू लागलं आजच्या माणसाचं वागणं. 

स्वार्थ आणि अर्थ (पैसा ) होत आहेत मित्र, 
            जगणं हिसकावून घेत आहे काळोख्याची रात्र. 
आळसाने संपून टाकलाय आमच्यामधील संघर्ष, 
          व्हायचे ते आजच होऊ दे, कशाला  उगाच वर्ष.

आयुष्याच्या प्रवाहात वाहत -वाहत गेलो, 
           कळलं नाही आम्हाला कधी समुद्रात आलो. 
वाटलं मग सगळं पाणी, माझंच आहे हे, 
             जिभेने सांगितलं वेड्या, खारट आहे ते. 

जगणं काय असतं विसरलो आहोत आम्ही, 
             आपल्याच माणसाला म्हणतो काय केलं तुम्ही? 
वाटत मग एका क्षणी का होते हार? 
                    आठवतो जोडीचा मित्र तो अहंकार. 

हसत- खेळत माणूस जीवनात मोठा होतो, 
              स्वतःसाठी जगतांना कधी दुसऱ्यासाठी जगतो. 
ज्ञानी माणूस स्वतःहून जग निरखून पाहतो, 
                अज्ञानी माणूस पुढे व्यर्थ होऊन जातो. 

म्हणूनच 
 जगतांना प्रत्येक क्षणी आनंदाने जगा, 
           ईश्वराने जीवन दिलंय पुर्ण विश्व बघा.
सांगता येत नाही उद्या काय होईल, 
               जगण्यासाठी जीव राहील की जाईल? 

मारतावेळी म्हणाल मग, 
या जन्मी मनासारखं जगताच आलं नाही, 
  पुन्हा जन्म होऊ दे, तुझ्याच पोटी आई,तुझ्याच पोटी आई.

                                                      हर्षल दत्तात्रय चौधरी #जगणं
Message-stay safe from corona virus
harsh7737998481067

Harsh

New Creator