#माझ्या मनातले कळत नाही.... हा आजकालचा पाऊस सायंकाळ शिवाय पडत नाही तिच्या मनातले बहुतेक कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... दुपारच्या उन्हात सावली कालवून बनवावे वाटते सुगंधी स्वप्नं अशात ती माझ्या सोबत असताना तिने रहावे मिठीत मग्न कोरत रहावी मी धुंदीची कविता स्पर्शाच्या बोरूने तिच्या मुलयम त्या हातावर अन् पावसाच्या चाहुलीने तिने ओठ टेकवावे माझ्या ओठांवर पण नेमकाच साला हा पाऊस मिठी असताना कोसळत नाही तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... पेरणी बिरणी ठीक आहे राव पण जोडप्यांचाही विचार करावा त्याने दोनच रोपटी असली जरी रानात थोडं का होईना झिरपावं त्याने पाऊस पडायला लागला रे लागला की ती माझ्यात वितळायला लागते अन् तिच्या देहाची कस्तुरीसुद्धा हवेत छान दरवळायला लागते पण बरोबर अशाच वेळी हा पाऊस माझी प्रार्थना ऐकत नाही तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... चिखल होतो पाणी साचते तिच्या पायातले पैंजण वाजते पावसात भिजताना पदर उडतो मग ती कसली सॉलिड लाजते तिच्यावरला सारा पाऊस मला अंगावर घ्यायचा असतो म्हणून भेटल्यावर रोज दुपारी पावसाला मी ये रे पावसा म्हणतो पण या भाऊला नेमक्या वेळी माझी तगमग दिसत नाही तिच्या मनातले कळते त्याला पण माझ्या मनातले कळत नाही...... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #पाऊस_आणि_प्रेम