#गेला अवकाळी पडून.... गेला अवकाळी पडून मेघ आश्वासनांचे दाटले घोषणांची बरसात होऊन थेंब शब्दांचे सांडले बांधाने बघा आता कॅमेरा फिरेल ताफा येईल सरकारी फुकटच्या पंचनाम्याने रकाने भरतील मग कागदावरी सुका म्हणू का ओला नाव त्याला काय देऊ अरे दृष्ट दुष्काळा तु उभा राहीलास अनाहुतपणे माझ्या दारी सांग मी पाय कसे रोवू माझ्या सातबाऱ्यावर झाला साऱ्या कर्जाचाच डोंगर गळी माझ्या पुन्हा पुन्हा आवळला जाई सावकारी फास सांग कसा ओढु मी नांगर अद्रक लसुण अन् कांद्याचीही निष्ठूर पावसा मान मोडली गहू हरभऱ्यांना गर्भातंच तडे भेटतात ज्वारी बाजरीही मग उभ्या उभ्यानंच रडे नाही द्राक्षे तारुण्यात नाही डाळी त्या शेतकऱ्याच्या हातात चार महिन्यात नाही का रे पडला तु पोटभर आता अवजड घेऊनी कोसळूनी का रे मुखी आलेला दाणा तुच ओरबाडून नेला अवकाळी आलास अन् घेऊन गेलास आयुष्यातला बहर सांग मज मग तुच आता कसा टाकु तो मंडप आज मी कन्यादानासाठी बाप म्हणून मी लाचारीचं जीणं हे जगतो सांग मजला तुच किती झुरु मी माझ्या काळजाच्या तुकड्यासाठी लाडाकोडात वाढवली लेक माझी हो लाडकी कशी करु सांग बा तिची पाठवणी माझी झोळी झाली तुझ्या अवकाळी कृपेमुळे रे फाटकी संपून गेले ते नेत्यांचे कोरे दौरे अन् पंचनामे गाड्याघोड्यांचा तो ताफा देखील माघारी परतला आकडे मोड केली फक्त कागदी चेक माझा तो कोराच पडला.. चेक माझा तो कोराच पडला.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #चेक_माझा_तो_कोराच_पडला