Nojoto: Largest Storytelling Platform

जगून घे जीवलग मैत्रिणी , राहा आनंदाने घे विसावा क्

जगून घे जीवलग मैत्रिणी , राहा आनंदाने
घे विसावा क्षणभर , सोसलेस एकटीने
चिल्यापिल्यांची घेतलीस नेहमीच काळजी
राघूविना केलेस कार्यक्षम त्यांना
डाव एकटीने मांडलास सारीपटावर
साऱ्या सोंगट्या पडल्या जरी उलट्या
ना कधी खचलीस , ना दमलीस
कष्टाची कामे तत्परतेने केलीस
पाखरांच्या पंखातही बळ आलंय
स्वच्छंदी जगायचं त्यांना कळलंय
नको करुस काळजी आता त्यांची
नको करुस कंटाळा खाण्याचा
अन् अतिविचार नको पैशांचा
खात राहा तुला जे जे आवडतं
आणि राहा मस्त छान गाणे गात
नाही भरवसा पुढच्या घटकेचा
जाणूनी घे प्रत्येक क्षण आनंदाचा
गरज पडल्यास हाक मार हक्काने
नको करु संकोच , बाळगू नको बंधने
तू म्हणशील तिथे विनाविलंब भेटू साऱ्या
लगेच अवतरतील भूतकाळातल्या पऱ्या
सहलीचे आयोजन करु , विहार करु गगनी
जगू स्वप्न उद्याचे ओंजळीत घेऊनी

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे #गातच राहावे

जीवनगाणे #गातच राहावे #जीवनअनुभव

27 Views