दिवाळीच्या फराळानी भरवली यंदा सभा, कुरकुरीत राहण्याचा प्रश्न प्रत्येकाच्या मनी उभा ! दिवाळी आली तरी पाऊस करत नाही परतीचा विचार, चिवडा, चकली, कडबोळी आपल्या भवितव्यानी बेजार ! चिवडा म्हणे भाजक्या ऐवजी आता पोहे भिजके मिळणार, चकली म्हणे मऊ पडले तर अंगावर काटा कसा टिकणार ! शंकरपाळ्यांना वाटे आपण आता मऊ पडणार किती, अनारस्यांच्या मनात भरली चिवट होण्याची भिती ! लाडू मात्र त्यातल्या त्यात थोडासा सुखी होता, म्हणत होता यंदा मला लागणार नाही म्हणे बत्ता ! सगळ्यांनी मग देवाकडे मिळून एक साकडं घातलं, लाज आपली टिकावी म्हणून पाऊस थांबवायला सांगितलं ! शुभांगी गावंडे दिवाळी