झाली सारी तयारी मयताची,रडारड साऱ्या नातेवाईकांची. खूप वेळ झाली म्हणत पार्थिव उचलले, स्मशानभूमीच्या दिशेने साऱ्यांनी पाऊले उचलली. जय राम श्री राम चा गजर सर्व मुखी, खांदा लावूनी पार्थिवास दुःखात सहभाग दर्शवी. मडका धरलेल्याच्या खांद्यावर ठेवी हात कुणी, तर लाया,फुले वाहणाऱ्या सोबत इतर कुणी. पोहोचताच स्मशानभूमीत आराम करण्या,जो तो जागा शोधी, सरपण रचून पार्थिव ठेवता,पाणी पाजण्या भाचाला शोधी. घोळके जमा जिथे तिथे,मयता बद्दल वार्ता इथे तिथे. चांगले झाले सुटला म्हणे कुणी,तर खूप वाईट झाले असेही म्हणे कुणी. दिली अग्नी,मूठ माती ही झाली,पळण्याची लगेच सगळ्यांची घाई झाली. कुणीच न स्मशानात पार्थिव एकटाच जळत राही, कुणाला घरी तर कुणाला कामावर जाण्याची घाई राही. पाहता ही अंत्ययात्रा एकच गोष्ट लक्षात येई, कितीही जुळली नाती तरी मनुष्य एकटाच जाई. काही दिवस दुःख घरच्यांना तर काही क्षण समाजाला, पुन्हा तेच वागणे सर्वांचे,आठवण फक्त वर्षावर्षाला. अंत्ययात्रा.. #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #स्मशानभूमी #अंत्येष्टी #अग्नीदहन #शेवटचाप्रवास झाली सारी तयारी मयताची,रडारड चालू साऱ्या नातेवाईकांची. खूप वेळ झाली म्हणत पार्थिव उचलले, स्मशानभूमीच्या दिशेने साऱ्यांनी पाऊले उचलली. जय राम श्री राम चा गजर सर्व मुखी, खांदा लावूनी पार्थिवास दुःखात सहभाग दर्शवी. मडका धरलेल्याच्या खांद्यावर ठेवी हात कुणी,