रात्र सरली दिवस उगवला गत सारुनी सत्य प्रकटला आसवांना पापण्यांनी कवेत घेतले रुदनास अलिंगन ऋदयाने घातले .. प्रभा घेऊनी रविकर अवतरता सोनेरी शालूत शोभली धरतीमाता दवबिंदुनी पादस्पर्श हळुवार केले गार वाऱ्याने हळूच कुंतल सावरले .. भेटीत वसुधेच्या रवी झाला उतावीळ झोपेची चादर झटकून मीलनास व्याकूळ वाऱ्याची गाणी वृक्षवेलींनी गाईली ऐकून फुलेही सुगंधाने न्याहली.. इवलेसे मन प्रकृतीची पाहून लिलया विसरले सारी दु:खे अन् मोहमाया मागते मृत्यूनंतरचे जीवन असावे कोणासम हीच प्रकृती घ्यावी मलाही अणूरेणूच्या कणासम.. #सकाळ