बाई मज लागली भलतीच खोड, या चंद्रातून वाटे कृष्णमुख गोड, साऱ्यांस खुलवी हे नभीचे चांदणे, मज मात्र भुलवी कान्हाचे हसणे, साऱ्या घरी आज गोड दुधाच्या घागरी, मला आवडते कान्हाची मधुर बासरी, साऱ्यांना वाटते, झाली कोजागिरीची बाधा, मज वाटते मी झाले माझ्या कृष्णाची राधा। #कृष्ण #कान्हा #कोजागिरी #चंद्र #yq_gns