शेती हिरवी हिरवी झाडे इथे आहे किती शांती आनंदाने जगणे इथले नाही कसली भीती चार महीने पाउस पडुन फुलते आमची शेती नद्या, नाले, विहिर, तलाव तुडुंब भरुन वाहती उस हळद पिक येते आमच्या शेतीमधी निगा खुप करतो होते नुकसान कधीकधी बाप माझा मेहनत करतो पिक घेण्याआधी तेव्हा कुठे भर पडते धान्य पिकण्यामधी कडक उन्हात राब राबतो आम्ही शेतकरी थांबित नाही काम भुक, ताण लागली तरी हिरव पिक, काळी माती आनंद चेहऱ्यावरी हेच आम्हा काम करण्यास खूप उत्साह भरी गाय म्हैस बैल चारतो रोज चारा घालतो टाइमपास म्हणुन आम्ही त्यांनाच बोलत बसतो थंड पाणी हवा भेटते यात सुख मानतो म्हणुन निसर्गाची किंमत खरीखुरी जाणतो -Badboy #quotes #poetry #pratilipi #poem