Nojoto: Largest Storytelling Platform

White मी भाग्यवंत आनंदल्या मनाला कसलीच खंत नाही..

White मी भाग्यवंत

आनंदल्या मनाला कसलीच खंत नाही...
चिडण्या-चिडवण्याला, मजला उसंत नाही!

त्यांचा प्रभाव आहे माझ्या तनामनावर...
सारे ऋतू कलंदर, केवळ वसंत नाही!

जमते तसे कराया सरसावतो पुढे मी...
नन्नातल्या सुराचा, पाढा पसंत नाही!

साधासुधा तसा मी साधे विचार माझे...
पटल्यास घेत जावे, मी साधुसंत नाही!

लिहिण्यामुळे मिळाला गोतावळा मला हा...
सांगा कसा म्हणू मी, मी भाग्यवंत नाही?

जयराम धोंगडे, नांदेड
  (9422553369)

©Jairam Dhongade #flowers
White मी भाग्यवंत

आनंदल्या मनाला कसलीच खंत नाही...
चिडण्या-चिडवण्याला, मजला उसंत नाही!

त्यांचा प्रभाव आहे माझ्या तनामनावर...
सारे ऋतू कलंदर, केवळ वसंत नाही!

जमते तसे कराया सरसावतो पुढे मी...
नन्नातल्या सुराचा, पाढा पसंत नाही!

साधासुधा तसा मी साधे विचार माझे...
पटल्यास घेत जावे, मी साधुसंत नाही!

लिहिण्यामुळे मिळाला गोतावळा मला हा...
सांगा कसा म्हणू मी, मी भाग्यवंत नाही?

जयराम धोंगडे, नांदेड
  (9422553369)

©Jairam Dhongade #flowers