Nojoto: Largest Storytelling Platform

*काठ* तो किनारा आता झालाय काठ,वाहत्या भावनांच्या

*काठ*
तो किनारा आता झालाय 
काठ,वाहत्या भावनांच्या
पदरावर मिटलेपणाचा 
रचलेला पानेरी घाट 
तो वारा हि आता अनोळखी 
वाटतो ,
कित्ती वाहिला प्रेमाने
तरी डोळ्यांच्या काठाला
खारेच करून सोडतो
तो गंध हि आता ,बैचेन करतो
अनोळखी वाटत असला तरी
गंधित आठवणींचे काठ मोहरून
टाकतो
कित्ती किनारे,कित्ती वारे कित्ती
गंध सगळेच वेगवेगळ्या वाटांवर
सोडले तरी ,सगळ्या वाटा ,
पुन्हा मिळून येतात ,
त्याच वाटांचे काठ 
भावनेच्या पदराला उडताना
 रोकणारी साथ देतात
        पल्लवी फडणीस,भोर✍ #beach
*काठ*
तो किनारा आता झालाय 
काठ,वाहत्या भावनांच्या
पदरावर मिटलेपणाचा 
रचलेला पानेरी घाट 
तो वारा हि आता अनोळखी 
वाटतो ,
कित्ती वाहिला प्रेमाने
तरी डोळ्यांच्या काठाला
खारेच करून सोडतो
तो गंध हि आता ,बैचेन करतो
अनोळखी वाटत असला तरी
गंधित आठवणींचे काठ मोहरून
टाकतो
कित्ती किनारे,कित्ती वारे कित्ती
गंध सगळेच वेगवेगळ्या वाटांवर
सोडले तरी ,सगळ्या वाटा ,
पुन्हा मिळून येतात ,
त्याच वाटांचे काठ 
भावनेच्या पदराला उडताना
 रोकणारी साथ देतात
        पल्लवी फडणीस,भोर✍ #beach