लालपरीचा प्रवास गर्दीमधला प्रवास होता, जायचं की नाही प्रश्न मोठा? दिमाखात उभी लालपरी, वाटलं पोहचवेल का मला घरी ? सुरू झाला मग बसचा प्रवास, धो-धो पावसाचा वेगळाच त्रास. खिडकीतून आत पावसाच्या सरी, हळू-हळू चाले लालपरी. वळणा-वळणांचा रस्ता,रस्तामधील चढण, खिडकी बाहेरील निसर्गात अडकले मन. काय तो निसर्ग,काय ती झाडे सगळं डोळ्यात साठवून मी जाई पुढे . चालता चालता लालपरी मध्येच होई बंद, लागला होता तिलापण निसर्गाचा छंद. पुन्हा मग दिमाखात चाले लालपरी, घाटातून ती चालतांना वाटे खूप भारी . तिलाच माहीत रस्त्यावरील खड्डे किती खाली, तिलाच माहीत किती मैल धावून ती आली ! धावून-धावून शेवटी ती गाववेशीवर पोचली, बघून माझ्या गावाकडं स्वतःशीच ती हसली. अडथळ्यांना पार करून चाले लालपरी, छत गळत असून पण मला वाटली भारी . असा हा लालपरीतील आठवणींचा प्रवास, वाटला जरी त्रास ,तरी असतो मात्र खास ........ -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh #Lalpari #Bus #Travel #Nature #pravasi #Life poetry poetry quotes Extraterrestrial life Hinduism love poetry for her