Nojoto: Largest Storytelling Platform

गझल महाराष्ट्राची.... (प्रसूनांगी /२१ /लगागागा/३)

गझल महाराष्ट्राची.... 
(प्रसूनांगी /२१ /लगागागा/३) 

कधी काळी जसा होता तसा आहे
अजिंठा हा खरा माझा वसा आहे

नभी भगवा फडकतोया स्वराज्याचा
दऱ्या खोऱ्यात शिवबाचा ठसा आहे

इथे लोणारच्या मातीत रुतलेला
खगोलाचा पुरातन कवडसा आहे

दिवाळीला नि होळीला पुरणपोळी
फराळाला करंजी अनरसा आहे

नका थांबू कुणी पवनारला जाता
पुढे आनंदवन हेमलकसा आहे

मनी भक्ती पथावर विठ्ठलासंगे
सुफी धारा शिखांचा खालसा आहे

महाराष्ट्रा मरण येवो कुठेही मज
तुझ्यातच जन्मण्याची लालसा आहे

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ

©Satish Deshmukh महाराष्ट्र

#Flower
गझल महाराष्ट्राची.... 
(प्रसूनांगी /२१ /लगागागा/३) 

कधी काळी जसा होता तसा आहे
अजिंठा हा खरा माझा वसा आहे

नभी भगवा फडकतोया स्वराज्याचा
दऱ्या खोऱ्यात शिवबाचा ठसा आहे

इथे लोणारच्या मातीत रुतलेला
खगोलाचा पुरातन कवडसा आहे

दिवाळीला नि होळीला पुरणपोळी
फराळाला करंजी अनरसा आहे

नका थांबू कुणी पवनारला जाता
पुढे आनंदवन हेमलकसा आहे

मनी भक्ती पथावर विठ्ठलासंगे
सुफी धारा शिखांचा खालसा आहे

महाराष्ट्रा मरण येवो कुठेही मज
तुझ्यातच जन्मण्याची लालसा आहे

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ

©Satish Deshmukh महाराष्ट्र

#Flower