Nojoto: Largest Storytelling Platform

प्रीत तुझी रोज सकाळी कुशीत माझ्या, चांदण्या रुप

प्रीत तुझी 

रोज सकाळी कुशीत माझ्या, 
चांदण्या रुपाची तू दिसावी स्वप्नात 
टप टप नाऱ्या केसांनी ओल्या,
ह्रदयी अलवार छेडली प्रित मनात  ||१||

आरसा बिलोरी लाजला पाहून, 
मृगनयनी, तारूण्य कलिका दिसता 
मी तर भोळा श्वास रोखून असा ,
रोमांचित झालो खळी गालावर उमटता ||२||

शिल्प सुरेख आखीव रेखीव, 
प्रेमात पडला असावा कलाकार सुध्दा 
अवखळ जल हे उधळीत लाटा
मोहात झिजला कठीण कातळ सुध्दा  ||३||

आला लहरत एक चावट भुंगा 
कळ दाटून थरथरली नवथर काया
केसांत माळता गजरा होई सुगंधी
प्रित तुझी बावरी लावी जीवाला माया ||४||

मी प्रेमात गहीऱ्या आकंठ बुडालो 
शब्द मधाळ होऊन कवितेत सांडलो 
स्वप्न ते विरून गेले हवेत धुक्या सारखे 
तरी रोज पहाटे नव्याने तुझ्यावर भाळलो  ||५||

कवी गीतकार पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर ७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar,  #prittuzi

#Mic
प्रीत तुझी 

रोज सकाळी कुशीत माझ्या, 
चांदण्या रुपाची तू दिसावी स्वप्नात 
टप टप नाऱ्या केसांनी ओल्या,
ह्रदयी अलवार छेडली प्रित मनात  ||१||

आरसा बिलोरी लाजला पाहून, 
मृगनयनी, तारूण्य कलिका दिसता 
मी तर भोळा श्वास रोखून असा ,
रोमांचित झालो खळी गालावर उमटता ||२||

शिल्प सुरेख आखीव रेखीव, 
प्रेमात पडला असावा कलाकार सुध्दा 
अवखळ जल हे उधळीत लाटा
मोहात झिजला कठीण कातळ सुध्दा  ||३||

आला लहरत एक चावट भुंगा 
कळ दाटून थरथरली नवथर काया
केसांत माळता गजरा होई सुगंधी
प्रित तुझी बावरी लावी जीवाला माया ||४||

मी प्रेमात गहीऱ्या आकंठ बुडालो 
शब्द मधाळ होऊन कवितेत सांडलो 
स्वप्न ते विरून गेले हवेत धुक्या सारखे 
तरी रोज पहाटे नव्याने तुझ्यावर भाळलो  ||५||

कवी गीतकार पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर ७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar,  #prittuzi

#Mic