सध्याच्या वातावरणामध्ये खरच माणसाला माणसाची सगळ्यात जास्त गरज आहे." मला बोलायचय", 'मला गरज आहे तुझी' , मला मदत करशील का? , मला खूप tension येतंय, मला खुप एकटं एकटं वाटतंय, मला Plzz सल्ला देशील का? असे खुप सारे इनबॉक्समध्ये मेसेजेस येतील. फोन येतील..किंवा एखाद्याच्या बोलण्यावरून समोरची व्यक्ती tension मध्ये आहे असं जेव्हा वाटेल ना ,तर त्यांना टाळू नका.आणि ignore तर अजिबात करू नका. कारण आता या कोरोनाच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणाने वाईट फेज मधून जात आहेच.अनेक जण business loss मुळे तणावात असतील , अनेकांना Lockdown नंतर नोकरी राहिल की नाही याचं tension असेल, किंवा इतर कोणतं ही कारण असेल..तर कुणालाही टाळू नका. पण काही जणांना आपल्या दुःखातून,टेन्शन मधून जमतं स्वतःच स्वतःला सावरायला..पण ते सगळ्यानांच नाही जमत ! तेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीला , आपल्या मित्रमैत्रिणींना मदत करा.तुमचा एक फोन, एक मेसेज कोणाचतरी आयुष्य वाचवू शकतो!आपला कणभर वेळ दुसऱ्यांना दिल्याने आभाळ कोसळनार नाहीये..! पद, पैसा , प्रतिष्ठा सगळं पुन्हा कमवता येईल मित्रांनो,पण त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या सक्षम अन् मजबूत असणं खुपचं गरजेचं आहे..! आभाळाएवढया महत्त्वाकांक्षा कित्येकदा मातीत घालतात , आज एका साध्या विषाणुने तुम्हाला तुमच्या परवानगीविना घरी बसवलय हे कायम लक्षात ठेवा..! तेव्हा एकमेकांना साथ देऊ, एकमेकांना जपू व माणूस म्हणून आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने एकमेकांवर प्रेम करत जगु इतकंच..!! " भावनांचे विश्व " ( प्राजक्त ) #Inspired by another one🤗 #inspiredvibes🤞✌️ #inspiredthoughts🤔 #inspiredme 🤗