कलाकार कोणत्याही क्षणी स्वस्थ नसतो. आपल्या निर्मितीत ग्रस्त असतो. स्वप्नांच्या दुनियेत मस्त असतो. कलाकार नेहमी व्यस्त असतो. निवारण त्याचे जो त्रस्त असतो. हुरूप त्याचे जो सुस्त असतो. प्रेरणा त्याची जो खस्त असतो. कलाकार नेहमी व्यस्त असतो. कमी तिथे जास्त असतो. हर परिस्थितीत रास्त असतो. उगवत्या उमेदाचा वरदहस्त असतो. कलाकार नेहमी व्यस्त असतो. अभिप्राय प्रेम करून कलेवर मदमस्त असतो. कलाकार म्हणूनच भारदस्त असतो. गुरूवर्य सौ. सुरेखा हिरवे