आज आमची दोन वर्षांनी परत भेट झाली. तीची विचारपूस करण्याची मला हिम्मत झाली नाही. काळीज पुन्हा मोठ्याने धडधडायला लागलं.. जुनी जखम ताजी झाली.. विचारांनी इतका गुंतलो होतो की ती कधी माझ्या पुढ्यात येऊन थांबली ह्याचे मला भानच राहिले नाही. एक स्मित हास्य देऊन तीने सहज विचारले, "कसा आहेस? सगळं मजेत ना?" हात मिळवला आणि आपल्या वाटेने निघून गेली जसं काही झालंच नाही.. आणि मी तीच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत विचार करीत होतो की खरंच कधी हिला माझ्यावर प्रेम झालं नाही?... ती फक्त माझी एक कल्पना होती की ती माझ्यावर प्रेम करत होती? सुप्रभात लेखकानों आजचा विषय आहे परत भेट झाली... हो त्याची आज परत भेट झाली... #झाली #परत1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine