Nojoto: Largest Storytelling Platform

१. बासरीवरुन हळूवार फुंकर मारतोस, ती मूकरुदन क

१. बासरीवरुन हळूवार फुंकर मारतोस,
    ती मूकरुदन करताना.
    पण माझ्याकडे बघतही नाहीस,
    मी तुझ्या दर्शनावाचून मरताना.
२. कृष्ण म्हणून तू मला,
    कधीच भेटायला येऊ नकोस.
    वेड लावून निघुन जाण्याची त्याची सवय,
    निदान तू तरी घेऊ नकोस.
३. अशी कशी राधा 
     शामरंगास भाळली.
     वेड्या राधेची ही प्रिती
     कान्ह्यास नाही कळली.
४.  तुझ्या बासरीवरून कधी कधी
     आयुष्य अर्पूण टाकावं वाटतं.
     माझ्यापेक्षा तुला तीच जवळ 
     म्हणून कधी तीला फेकावं वाटतं.
     #कोमलमाळी"मृदा"
     #throwback
     #ShriKrishnaJanmashtami #kemscorner #MarathiKavita #Marathipoem #charolya #Radha #RadhaKrishna 

#Janamashtmi2020
१. बासरीवरुन हळूवार फुंकर मारतोस,
    ती मूकरुदन करताना.
    पण माझ्याकडे बघतही नाहीस,
    मी तुझ्या दर्शनावाचून मरताना.
२. कृष्ण म्हणून तू मला,
    कधीच भेटायला येऊ नकोस.
    वेड लावून निघुन जाण्याची त्याची सवय,
    निदान तू तरी घेऊ नकोस.
३. अशी कशी राधा 
     शामरंगास भाळली.
     वेड्या राधेची ही प्रिती
     कान्ह्यास नाही कळली.
४.  तुझ्या बासरीवरून कधी कधी
     आयुष्य अर्पूण टाकावं वाटतं.
     माझ्यापेक्षा तुला तीच जवळ 
     म्हणून कधी तीला फेकावं वाटतं.
     #कोमलमाळी"मृदा"
     #throwback
     #ShriKrishnaJanmashtami #kemscorner #MarathiKavita #Marathipoem #charolya #Radha #RadhaKrishna 

#Janamashtmi2020
komalmali2983

Komal Mali

New Creator