"आठवण"म्हणजे कधी कधी मिलनाच्या सुंदर बेटावर नेणारी तर कधी वाळवंटाच्या निखार्यावर घेऊन जाणारी कधी मंजुळ भासणारी तर कधी एकांतात कोसळणारी मनाला भांबवुन सोडणारी एक अनोखी किणकिण! चंद्रचांदण्यांचा मिणमिणणारा प्रकाश म्हणजे "आठवण" किंवा ...किर्र ...गर्द...रानात अंधारल्या रात्री भयावह वाटवरून चालण्यासारखं वाटण म्हणजे सुद्धा'आठवण'! निपुण कलाकाराने मधुर स्वररचना करून मंत्रमुग्ध वातावरणनिर्मिती करावी किंवा एखाद्या करूण स्वर आळवणाऱ्या सतारीची अचानक तार तुटावी, हा आभास अंतर्मनाला स्पर्श करते ती "आठवण" 'आठवण' म्हणजे काळ्याकुट्ट ढगांनी झाकळून गेलेल्या आकाशातून मंद चांदणे झिरपावे इतकी सुखद भासावी अशी रात्र किंवा चहूकडे अंध:काराने थैमान घालावे व मनाचा बांध फुटून ...स्फुंदून स्फुंदून आक्रंदनाने क्रूर पहाटेची सुरुवात व्हावी... #Rutuwrites .... आठवण:एक अनोखी किणकिण!