Nojoto: Largest Storytelling Platform

कुठे दडलंय ते समाधान,काही केल्या कळेना. जितके पाहि

कुठे दडलंय ते समाधान,काही केल्या कळेना.
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळते,तरी काही केल्या मन भरेना.
गोष्ट खाण्याची असो,मौज मजेची वा असो जीवन जगण्याची,
आता कुठेच ऐकू येई ना बाब समाधानाची.
कांदा भाकरी असताना समाधान माने ना,म्हणून झुणका भाकरी दिली,
तरीही समाधान होईना गोष्ट मटण भाकरी वर आली.
खाण्यासोबत फिरण्याची ही गोष्ट थोडी न्यारी,
सायकल असताना समाधान नाही,म्हणून मोटर सायकल वर उडी,
त्यातही काही समाधान होईना म्हणून चार चाकी दारी.
सहल निघायची पूर्वी बगिच्यात समाधान होईना, डोंगर दऱ्या बघणे चालू झाले.
त्यातही समाधान मिळेना लॉंग ट्रिप ची संकल्पना आली.
असंच तर घडत राहतं,पाहिजे ते मिळतंय तरी कमी पडतंय.
म्हणूनच म्हणतोय कुठं दडलंय ते समाधान काही केल्या कळेना,
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळतंय तरी मन भरेना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे दडला तो समाधान...

#कुठेदडला
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.