थव्यात काय कुणीही उडतो पाखराने एकट्याने उडायला शिकावं... झुंडीत येऊन लढतात सारेच.. योद्ध्याला अभिमन्यू सारखं लढता यावं... गर्दी असो वा नीर्जन रस्ता... मार्ग निवडावा विवेकाने.... विरोध झाला विखारी तरी.. आपुली वाट चालावी त्वेषाने... यशापयश तर येत जात राहतं. पण अनुभव फुकट मिळत नाही... जीवन जगावं कसं माणसाने.. दुःख भोगल्यावीना कळत नाही... जे जे पोहचले आजवर ते ते.. एकटेच चालत गेले आहेत.. झुंडीत जगणारे सारेच कावळे.. गुमनाम होऊन मेले आहेत... काळाची झडप पडण्याआधी काल पटलावर एक अमीट ठसा ठेव... जिवंत हृदयं आपसूकच जपतील.. असा, काहीसा वसा ठेव... When Aadinatha Writes✍️ $♡ham Series 12 #Legacy