खरे की खोटे ह्याची शाहनिशा न करता, नुसतीच गप्पांची बोंब उठवायची, कुठलेही कारण नसताना एखाद्या गोष्टीची अफवा उठवायची, जरा तरी समजून घ्या अफवा उठवायची म्हणजेच विनाकारण अनेकांची मन दुखवायची. खूप मोठा दोष आहे पसरविणे अफवा, ह्या दोषाला स्वतःच्याच मनात लपवा, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना येऊ द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा.