सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती मावळतीची सारी किरणे मंतरली होती वादळे मनातली सांगून जातात मला ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती मीच करून ठेवतो स्वतःची उगा कोंडी स्पंदनांना बंधन येता कंपने शहारली होती अप्रूप किती सांगू तुला नात्यांचे कैलास ती नसल्यावर लेखणी थरथरली होती मळभ दूर सारून इंद्रधनू पसरताना प्रीत नव्याने चांदण कुशीत बहरली होती RJ कैलास #सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती मावळतीची सारी किरणे मंतरली होती वादळे मनातली सांगून जातात मला ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती मीच करून ठेवतो स्वतःची उगा कोंडी स्पंदनांना बंधन येता कंपने शहारली होती