आजचा दिवस ही मावळला नेहमीसारखाच. काहीसा व्यस्त, थोडासा त्रस्त आणि तरीही मस्त. हल्ली असेच जातात दिवस. दर तासाला लक्ष जात घड्याळाकडे, काट्यांचा हि राग येतो. कधी कधी एकाच जागी अडून बसल्यासारखे वाटतात तेही . तस मस्तच चाललय माझ. आणि तू ही मजेतच असशील. तसा फार काही फरक नाही पडत तूझ्या नसण्याचा. मात्र, तूझ असण हवस वाटत राहतं. कदाचीत नंतर ही जागा कुणीतरी घेईल. मग आपोआप विरेल ही आतली उद्विग्नता. तू आठवशील अशी एकही गोष्ट करायची नाही हे मी ठरवलय आणि तंतोतंत पाळतेय सुध्दा. बाकी फासलेल्या गोष्टी उतरवता येतात. पण, भिनलेल्या बाबींना काढता येत नाही हे वेगळ.या सा-याचा मी आता विचार करत नाही... #din to beet gaya#