काही बंध असे असतात फक्त अंतरास जोडणारे प्रेम असतो की त्याग ? काहीच न कळणारे.. नजरेला नजर मिळते त्यातुनच प्रेम जडणारे ओठावर शब्द रहातात तरीही शब्दा विण कळणारे.. धागे मुळीच कच्चे नसतात विण मात्र जमत नाही म्हणुनच रेशमाच्या गाठी सहजा सहजी जुळत नाही.. अशा कितीक कहाण्या असतात कुठं सारीपाट फुलतो तर कुठं डाव अर्ध्यावरच मोडतो मनातल्या मनातच मग जो तो आपापल्या परीनं स्मृतीगंधसुमनांची माळ ओढतो.. ©शब्दवेडा किशोर #आयुष्य_जगताना