कधी आवळे शब्द हृदयाशी कणखर.... कधी वाटते शब्द असावेत प्रेमळ... कधी मी शब्दांच्या झुल्यावर झुलावे मी शब्दप्रेमी होऊन जावे...... कधी वाटे घ्यावे पांघरूण अंगाईचे..... कधी वाटते जागावे रात्री जोगव्यात... कधी मी शब्दांचे चांदणे पहावे.... मी शब्दप्रेमी होऊन जावे...... कधी वाटते बुडावे अलंकाराच्या नदीत... कधी आवडे हसायला छंदाच्या गुदगुदीत.... कधी मी शब्दांची कविता करावे..... मी शब्दप्रेमी होऊन जावे...... कधी वाटते आकाश पहावे रचनांचे... कधी वाटते घर बांधावे पुस्तकांचे.... कधी मी शब्दांचे ग्रंथ रचावेत.... मी शब्दप्रेमी होऊन जावे...... मी शब्दप्रेमी होऊनी जावे.... 🙏 विषय अगदी जवळचा दिल्याबद्दल.... मनापासून धन्यवाद शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #collab #yqtaai