चित्रचारोळी मंद झुळूक वाऱ्याची गंधित करून बघ गेली मोगऱ्याच्या परिमळाने काया माझी धुंद झाली बगीचाही गंधाळला मोगर्याच्या सुगंधाने सर पावसाची येताच कळ्या उमलतील नव्याने हा खट्याळ रानवारा भिरभिरतोय या काना सखीला माळ हा गजरा सांगतोय का या सजना घालूनी फूंकर कळ्यांना घुमतोय बघ हा धुंद वारा माळून गजरा सखीला फुलवतोय बटांचा पसारा सौ.भारती सावंत