#शेवटची वाट सांगुन बोलणारा तू एक खोटाच भाट आहे सांभाळ मनाला तू होणार घात आहे...... जोडून नाम कुणाचे तु सांगतो कशाला ? खोडून लिहिलेली तुझी ती खोटीच जात आहे...... आखून कलेचा तू देखावा खुप छान केला आयुष्याच्या रस्त्यावर मांडलेला तुझा हा पोटाचा घाट आहे...... शोधुनही न सापडे स्थिर मनाचे ते छानसे घरटे हलणा-या फांदीला बघ किती हा अस्थिरतेचा वात आहे...... नको सांगू ओरडून तु जगाला की मी जात बदलली रंग बदलणा-या त्या सरड्याचाही अरे माणसा तू मोठा बाप आहे...... असा किती अन् कुठवर फसवशील तू स्वतःच्याच मनाला लक्षात ठेव शेवटी तुजला साथ द्याया एकटी ती फक्त मसनवटीचीच वाट आहे...... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #शेवटची_वाट