*ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड केली. इकडून तिकडून पैसे आणून रोपे आणली, पेपर आणले आणि डोळ्यात स्वप्न साठवून टोमॅटो लावली. लावून १ महिनाही झाला नव्हता तर अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला. आपलं १ वर्षाच बाळ पाण्यात फिजल्यावर जी आपली हालत होईल तशीच हालत ती टोमॅटोची झाडी बघून शेतकऱ्यांची होत होती. झाडे जमिनीला टेकली म्हणून एका घाई पैशाचा विचार न करता बांधणी केली. काही दिवस उलटले झाडांना आता फुले डोकावू लागली. त्याच समाधान वाटणार तेवढ्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुन्हा तेच... फवारण्या सुरू झाल्या २ ते ५ हजारांची अवषधे फवारली जाऊ लागली, स्वतःच्या मुलाची जितकी काळजी घ्यावी तितकी काळजी शेतऱ्यानी टोमॅटोची घेतली. रात्री जर पाऊस आला तर अनेक शेतकरी कुटुंब काळजी पोटी झोपत नसायची. करपा आला, कॅल्शिअम कमी झालं, अळइ आली, अनेक रोग आले पण तो खचला नाही. अगदी निसर्गाशी संघर्ष करून त्याने पीक उभ केलं आणि आज त्याच्या कष्टाला काय किंमत मिळतेय..???* *टोमॅटो २ रुपये प्रति किलो !!!* *अरे लाज वाटुद्या माय बाप सरकार...😠😠 असच सुरू राहील तर शेतकऱ्यांच काही वाकड होणार नाही... अगदी वेळ पडली तर ते जमिनी विकून एका रात्रीत गाडी बंगला उभा करतील राहिलेल्या पैशाच्या व्याजात आरामात जगतील पण एक लक्षात ठेवा आम्ही जर शेती करणं सोडल ना तर तुम्हाला भाजी पासून दूध सुद्धा आयात करावं लागेल..!!!* ©Prasad Gite #indianfarmer