Nojoto: Largest Storytelling Platform

*कोण असतो गुरू.…* कधी तो मातृरूपी असतो जो बोबडे

*कोण असतो गुरू.…*

कधी तो मातृरूपी असतो 
जो बोबडे बोल जाणुनी 
 त्या बोबड्या बोलाना 
 एक नवीन अर्थ देतो

कधी तो पितृरूपी असतो
जो डगमगत्या पावलांना 
धिर देऊन आयुष्याच्या प्रवासात
न पडता चालायला शिकवतो

कधी तो मित्ररूपी असतो
जो चुकणाऱ्या वळणावर
साथ न सोडता आपल्याला
योग्य अयोग्याची पारख करवितो

कधी तो जोडीदार रुपी असतो
जो आयुष्याच्या कठीण प्रसंगातही
हार न मानता आयुष्याला 
निरंतर तेवत ठेवायला शिकवतो

आणि कधी तो शिक्षकरुपी असतो
जो ज्ञानाची शिदोरी पाठीवर देऊन
आयुष्य नावाच्या शाळेत  स्वतः शिकायला
प्रत्येकालाच नकळत सज्ज करतो...

शब्दांची गुंफण @प्राजक्ता वाघमारे - सोनावणे

©शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे #गुरुपौर्णिमा
*कोण असतो गुरू.…*

कधी तो मातृरूपी असतो 
जो बोबडे बोल जाणुनी 
 त्या बोबड्या बोलाना 
 एक नवीन अर्थ देतो

कधी तो पितृरूपी असतो
जो डगमगत्या पावलांना 
धिर देऊन आयुष्याच्या प्रवासात
न पडता चालायला शिकवतो

कधी तो मित्ररूपी असतो
जो चुकणाऱ्या वळणावर
साथ न सोडता आपल्याला
योग्य अयोग्याची पारख करवितो

कधी तो जोडीदार रुपी असतो
जो आयुष्याच्या कठीण प्रसंगातही
हार न मानता आयुष्याला 
निरंतर तेवत ठेवायला शिकवतो

आणि कधी तो शिक्षकरुपी असतो
जो ज्ञानाची शिदोरी पाठीवर देऊन
आयुष्य नावाच्या शाळेत  स्वतः शिकायला
प्रत्येकालाच नकळत सज्ज करतो...

शब्दांची गुंफण @प्राजक्ता वाघमारे - सोनावणे

©शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे #गुरुपौर्णिमा