अमावस्येची रात्रं, एकटा रस्त्याच्या कडेला चाललो अमावसेच्या काळ्या रात्री, सोबत कुणी असल्याचा झाला भास म्हणून पाहून इकडे तिकडे करू लागलो खात्री... पाहता दूरवर अंधारात दिसला थोडा प्रकाश, कसला तरी प्रकाश पाहून पाऊले टाकू लागलो पुढे सावकाश... अंधारातून टिमटिमत्या उजेडात एक लग्न जोड्यात सुंदर मुलगी दिसली, पाहत होतो दुरून तिला मी तर खदाखदा माझ्यावर हसली... हसत का आहे म्हणून मी प्रश्न केला तिला, लग्न माझ्याशी कर अशी म्हणत होती ती मला... तिचं असं बोलणं पाहून अचंबा च मला झाला, हात तिने पकडला माझा आणि गाठला कवठ्या नाला... कवठ्या नाल्यावर गेलो तर तिथे होतं समदं लग्नाचं वऱ्हाड, लग्न करण्यासाठी तिने हार न घालता टाकला गळ्यात माझ्या चऱ्हाड... मरून शरीर खाली पडलं तिथेच आणि माझा आत्मा झाला उभा, लग्न केलं तिच्या सोबत आणि संसार थाटला नवा... बरं झालं आईनं माझ्या तोंडावर पाणी टाकलं, खरंच लग्न झालं त्या हडळ सोबत, मला होतं वाटलं... मयुर लवटे भय रस कविता प्रकार #for #you