#गाथा_चिंतन सावध झालों सावध झालों ! हरिच्या आलो जागरणा !! जेथे वैष्णवांचे भार जयजयकार गर्जतसे !! गाथा सेवक mp || सार्थ तुकाराम गाथा || ||अभंग क्रमांक ३|| सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१|| जेथे वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२|| पळोनिया गेली झोप| होते पाप आड ते||३|| तुका म्हणे तया ठाया| वोल छाया कृपेची||४ || भावार्थ-मी विचाराने निश्चित जागा झालो .म्हणून हरिच्या भजन जागारास आलो .||१||ज्या हरिजागरात वैष्णवांचे समुदाय हरिनामाचा घोष करीत होते ||२ ||त्या नामघोषाने माझी झोप पळून गेली आणि जे पाप भजनास आड आले होते तेही पळून गेले ||३ ||तुकाराम महाराज म्हणतात जेथे वैष्णवांचा हरिजागर चालतो त्या ठिकाणी देवाच्या कृपेची सुखद साऊली असते ||४ ||