#सण आला हो माझ्या गौरी गणपतीचा.... वाजत गाजत आले बाप्पा थाटात सोन पावलांनी गौराईचे आगमन गौरी गणपती विराजमान मखरात भक्तीभावे षोडशोपचारे होई पूजन.... अंगणी रांगोळी दारी तोरणं सोनेरी गणेशोत्सवाचा थाटच भारी नैवेद्याला पंचपक्वानांची रेलचेल आनंदाला उधाण येईल दारोदारी.... विघ्नहर्ता,सुखकर्ता भक्तांचा कैवारी गौराई देई सदा सुख समृद्धी बाप्पा चरणी एकची ती प्रार्थना राहो तुझी कृपा होवो समाधान वृद्धी.... गणपती पाठोपाठ गौरी आनंदाचा सोहळा भारी स्वागताची जय्यत तयारी अन् सोबतीस दिव्यतेजलतिकास्वरूप महालक्ष्मीची सजावट न्यारी.... आहे तुझ्यात तो अन् माझ्यात तो जरी नसेल आपणास सोंड त्याची बोलतो तो करतो तोच तो आहेच बुद्धी आपल्यात त्याची.... वाहतो जरी दुर्वांची जुडी कितीक रंगास भुलतो मी आवडे मोदक त्याला मला नैवेद्य दाखवून चव घेतो मी.... जगाचे अपराध घेतले पोटी माझ्याच कर्माने का फुगतो मी वाहन त्याचे पाहतो जेव्हा माझ्यातील हाव संपवितो मी.... मातृभक्ती त्याने दाखविली वृद्धाश्रमाची पायरी गाठतो मी माझ्याच कर्माचे ओझे घेवून भविष्यात ती गाठ सोडवितो मी.... कितीक नावे तो सार्थकी लावतो मात्र प्रत्येक नावात त्यालाच शोधतो मी पूजाअर्चा भक्तीभाव मनात साठवून विश्वप्रार्थनेत फक्त त्यालाच पहातो मी.. शुभप्रभाती रूप तेजस्वरूपाचा हा भेद संपला शुभेच्छा स्वीकारणाऱ्या चेहऱ्यात तो दिसला भळभळत्या काळजात तव साजिरी मूर्ती ठसली केविलवाणे जगणे पाहूनी मम अंतरात व्यथा हसली.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #सण_आला_हा_माझ्या_गौरी_गणपतीचा