Nojoto: Largest Storytelling Platform

-- *पावसाचा परवाना* -- झालं बियाणं पेरून आता वाट

-- *पावसाचा परवाना* --

झालं बियाणं पेरून
आता वाट पावसाची
बोली लावली ढगांशी
त्यानं त्याच्या जिंदगीची

कैक दिस आले गेले
साधं टिपूस ही नाही
फक्त टिटवी ओरडी
रान कोरडं गं बाई

कशी करू मशागत
मले सुचनाचं काही
अश्रू ढाळून ढाळून
ओलावली उशी माही

कर्ज डोई वर झालं
मनी ईचार फासाचा
आवळला गळा घट्ट
दोर सावकी पाशाचा

गडी आतून खचला
केला ईचार मनाशी
विष पिऊन झोपला
पोरा घेऊन उराशी

पहाटेला जाग येता
फेस तोंडातून वाही
तिचा मोठा हंबरडा
पोरा कळनाच काही

त्याची बांधुनी तिरडी
केला ढगात रवाना
पाहू मिळतो का त्याला
पावसाचा परवाना

✍️ पंकज जावळेकर #OpenPoetry #shayri#marathi
-- *पावसाचा परवाना* --

झालं बियाणं पेरून
आता वाट पावसाची
बोली लावली ढगांशी
त्यानं त्याच्या जिंदगीची

कैक दिस आले गेले
साधं टिपूस ही नाही
फक्त टिटवी ओरडी
रान कोरडं गं बाई

कशी करू मशागत
मले सुचनाचं काही
अश्रू ढाळून ढाळून
ओलावली उशी माही

कर्ज डोई वर झालं
मनी ईचार फासाचा
आवळला गळा घट्ट
दोर सावकी पाशाचा

गडी आतून खचला
केला ईचार मनाशी
विष पिऊन झोपला
पोरा घेऊन उराशी

पहाटेला जाग येता
फेस तोंडातून वाही
तिचा मोठा हंबरडा
पोरा कळनाच काही

त्याची बांधुनी तिरडी
केला ढगात रवाना
पाहू मिळतो का त्याला
पावसाचा परवाना

✍️ पंकज जावळेकर #OpenPoetry #shayri#marathi