शब्द सखे शब्द सोबती शब्दा शब्दांतून जुळती नाती... अव्यक्त भावनांना आधार शब्दांचा विचारांच्या कल्लोळाला संग लेखणीचा... शब्दा शब्दांतून व्यक्त होते अंतर्मन श्वास मोकळा अशक्य शब्दाविण... कधी शब्द सुरेख मोतीयांच्या माळा लागता शब्दच जिवाला उठती कळा... शब्दांशिवाय निरस जिवनाचा पसारा शब्दांचाच असा हा आहे खेळ सारा... शब्द सखेसोबती, शब्द से होते है रीश्ते अव्यक्त भावनाओंको शब्द ही आधार जो विचार उमडते है उनको लेखनी का साथ शब्दों शब्दों में अंतर्मन दिखता है शब्दों के बिना खुला श्वास भी नही ले सकते शब्द कभी मोती के माला जैसे सुंदर होते है तो कभी शब्द ही जख्म करते है शब्दों के सिवा निरस जिवन का गुजारा