संचारबंदीमुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान कोरोना नियंत्रणासाठी संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राज्यात कडक संचारबंदी सुरू आहे. बंद पडलेली बाजारपेठ, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले आहेत. परिणामी भाजीपाला विक्री ठप्प झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. हिरवी मिरची वगळता टोमॅटो, कोथिंबीर सर्वच भाज्यांचे भाव पडल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतावर आलेला भाजीपाला त्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. एरवी उन्हाळ्यात भाजीपाल्याचा चांगला दर मिळत असतो. भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या परीने उपलब्ध असलेल्या पाण्यावर टोमॅटो, कोथिंबीर दोडके, वांगी, मिरची इत्यादी भाजीपालाचे उत्पादन घेतात. उत्पादनासाठी मोठा खर्चही केला जातो. मात्र कोरोणामुळे सर्वत्र लागलेली संचारबंदी, स्थगित झालेले विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, व बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत. शिमला २५ रुपये, दोडके २५ रुपये, फुलकोबी १५ रुपये, पत्ताकोबी १० रुपये, भेंडी २५ रुपये वांगे २० रुपये असा भाव मिळत आहे. उन्हाळ्यात ७० ते ८० रुपये किलो विक्री होणाऱ्या हिरव्या मिरचीला ३० ते ३५ रुपये दर मिळत आहे. ©Mahesh Bunde संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री