Nojoto: Largest Storytelling Platform

# कोठे जगतोय आपण ? संवेदनाहीन आहोत आम्ही विचाराने

# कोठे जगतोय आपण ?

संवेदनाहीन आहोत आम्ही
विचाराने दीन आहोत आम्ही
मुलींना सामान समजतो इतके नीच आहोत आम्ही

रस्त्यावर चालणारी ती तुमची नसते संपती
किती होणार रे या देशात निर्भयाची उत्पत्ती
कधी बस मध्ये तर रेल्वेत तुमची माणुसकी मरते
न्यायाच्या प्रतीक्षेत आमची न्यायव्यवस्थाही सडते

मेणबत्त्या खूप जाळल्या 
अत्याचाराने ग्रासलेली प्रेतंही जाळली
ज्यांनी केले अत्याचार आमच्या बहिणींवर
तशी वासनांध व्यवस्थाही आम्ही पाळली

जन्म घेण्यासाठी ती लढते 
रोज रोज इथल्या समाजातील डोळ्यांना ती नडते
कित्येक टपले तिची आब्रू लुटण्यासाठी 
त्यांना पाहून रोज रोज ती रडते

माहित नाही कधी तिची आबरू लुटली जाणार नाही
माहित नाही इथल्या रस्त्यावर तिचा श्वास  गुदमरनार नाही 
तिला मारले जातेय तिला तोडले जातेय
तिला ही जगायचेय तिला ही जगायचेय.

-अतिश शेजवळ #कोठे जगतोय आपण?