किती खरे किती खोटे ह्याची योग्य ती शाहनिशा करावी. उडत उडत आली जी खबर ती कधीच मनावर न घ्यावी. किती खरे किती खोटे ह्याचा शक्यतो स्वतःच अंदाज लावावा. कुठलाही अंतिम निर्णय घेण्याआधी त्या निर्णयाचा पुनर्विचार ही करावा. हल्ली विश्वास ठेवण्या सारखे काहीही राहिलेले नाही कुणावर नक्की विश्वास ठेवावा हे ही कळत नाही. देवच जाणो,कोण किती खरे किती खोटे वागतात एकच व्यक्ती असताना दुटप्पी कसे वागतात. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... किती खरे किती खोटे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील