Nojoto: Largest Storytelling Platform

तू सारखा असा येऊ नकोस रे. हे पावसा तू सारखा असा य

तू सारखा असा येऊ नकोस रे.

हे पावसा तू सारखा असा येऊ नकोस रे,
मुंबईला माझ्या पाण्यात डुबवु नकोस रे,
येथील जनता अनेक कामात व्यस्त आहे रे,
त्यांना नेत्यांचा कारणाने त्रस्त करु नकोस रे.

त्यांना जलमय मुंबई दिसेनाशी होते,
जनता पण बेहरेपण स्वीकारते रे,
कारण हे रडगाणे कोणाला सांगायचे रे,
म्हणून तुलाच म्हणतो तू सारखा असा येऊ नकोस रे.

तू पडल्याने त्रास होतो म्हटल्या,
सांगतात ते जनतेस तुला बंद करण्या,
अशा वक्तव्यांना तरी जरा घाबर रे,
आणि तू सारखा असा येऊ नकोस रे.

तुला पडायचे आहे तर मनमोकळेपणाने पड रे,
देशातल्या त्या दुर्गम भागात जिथे दुष्काळ आहे रे,
जिथे फक्त तुझा येण्याची आस आहे,
तुला बदनाम करण्याचा कट नाही आहे,
तिथे जाऊन धो-धो पड रे, 
पण इथे तू सारखा असा येऊ नकोस रे. #poem #poet #rain #mumbai #today #marathi #mumbaikar
तू सारखा असा येऊ नकोस रे.

हे पावसा तू सारखा असा येऊ नकोस रे,
मुंबईला माझ्या पाण्यात डुबवु नकोस रे,
येथील जनता अनेक कामात व्यस्त आहे रे,
त्यांना नेत्यांचा कारणाने त्रस्त करु नकोस रे.

त्यांना जलमय मुंबई दिसेनाशी होते,
जनता पण बेहरेपण स्वीकारते रे,
कारण हे रडगाणे कोणाला सांगायचे रे,
म्हणून तुलाच म्हणतो तू सारखा असा येऊ नकोस रे.

तू पडल्याने त्रास होतो म्हटल्या,
सांगतात ते जनतेस तुला बंद करण्या,
अशा वक्तव्यांना तरी जरा घाबर रे,
आणि तू सारखा असा येऊ नकोस रे.

तुला पडायचे आहे तर मनमोकळेपणाने पड रे,
देशातल्या त्या दुर्गम भागात जिथे दुष्काळ आहे रे,
जिथे फक्त तुझा येण्याची आस आहे,
तुला बदनाम करण्याचा कट नाही आहे,
तिथे जाऊन धो-धो पड रे, 
पण इथे तू सारखा असा येऊ नकोस रे. #poem #poet #rain #mumbai #today #marathi #mumbaikar