Nojoto: Largest Storytelling Platform

#अस्मिता स्त्री ची #बचावाचे प्रयत्न #खंबीर हवेत ◆

 #अस्मिता स्त्री ची 
#बचावाचे प्रयत्न #खंबीर हवेत
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

    घरगुती हिंसा अगर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार ही महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार मोठी समस्या आहे. त्यासाठी कितीही कायदे झाले तरी त्यापासून पूर्णपणे सुटका मिळत नाही. अशिक्षित आणि ग्रामीण भागात राहणार्‍या महिला याचा सामना जितका करतात तितकाच शहरी आणि सुशिक्षित महिलाही करत असतात. त्याविरुद्ध आवाज उठवायचा तर मानसिक ताकद हवी आणि या लढ्यात कोणीतरी आपल्यामागे खंबीरपणे उभं आहे याचंही पाठबळ हवं.

शरीरावरच्या काही खुणा महिलांच्या मानसिक आणि शारीरिक अत्याचाराची कथा अगदी सहज सांगतात. कधी त्यावर पाय घसरून पडल्याचं निमित्त पुढे केलं जातं, तर कधी स्वयंपाकघरातला छोटासा अपघात म्हणून त्यावर पांघरूण घातलं जातं. हे अत्याचार केवळ शारीरिक असतात असं नाही तर मनावरही त्याचे ओरखडे पडलेले असतात. शून्यातली नजर आणि डोळ्यातलं पाणी ती ही कहाणी सांगतात. सहन करणारी त्याविरुद्ध आवाज उठवत नसेल, तर बाकीच्यांना तिच्याबद्दल सहानुभूती दाखविण्याशिवाय काहीच करता येत नाही. अनेक घरात स्त्रियांना शारीरिक किंवा मानसिक अत्याचारांना सामोरं जावं लागतं. त्याची पातळी कितीही खालची असू शकते. सार्वजनिक किंवा घरातल्या चार भिंतीत होणारा अपमान त्यांना सहन करावा लागतो. तरी त्याविरुद्ध आवाज उठवायचा की नाही, या संभ्रमात अनेकजणी असतात. काहीवेळा आपण आवाज उठवला तरी आपल्या बाजूने कुणी उभं राहील की नाही, याचीही त्यांना खात्री नसते. एकीकडे महिला सशक्तीकरणाचे डंके वाजवले जात असताना त्याबद्दल अनेक महिलांना काहीच माहितीही असू नये, हा मोठा विरोधाभास आहे. नक्की कोणत्या त्रासांना घरगुती हिंसा या सदरात स्थान मिळतं, याचीही अनेकींना कल्पना नसते. आपल्या नशिबातच असं आहे म्हणून त्या सहन करत राहतात. याला कारण महिलांमध्ये जागृती नाही, हेच आहे.
घरगुती हिंंसा या सदरात अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचा समावेश होतो. शारीरिक

sandyjournalist7382

sandy

New Creator