°अश्रू° कितीही जरी विसरलेस तू मला पण मी कशी विसरू सांग तुला ? मेघातून बरसणारी जलधार सांग तूच, कधी कोरडी असणार ? कधीही माझी आठवण नाही झाली पण तुझी, मजला भेडसावणार ! बरसणाऱ्या त्या घन जलधारेत चिंब भिजायचं, मी नाही सोडणार ! नको होवुस माझ्या सुखात भागीदार तुझ्या सुखात, माझे सुख मानणार ! तेवढाच एक माझा तो हर्षौल्हास जलधारेसम नितळ असणार ! नको घेऊ माझ्या दुःखात सरकत तुझ्या दुःखाचा, मी होईन पातीदार ! माझे ते अश्रू त्याच जलाधारांत तुझ्याच नकळत सोडून देणार ! (सरकत : पाती, हिस्सा, वाटेकरी) ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav अश्रू...