भटके लोक आम्ही, भटकंती आमचा व्यवसाय हे नशिबी आमच्या लिहिलं हाय ।। मेंढरं, घोड घ्यायची नि भटकायचं हे गाव नि ते गाव पर भाऊ, आमची दशा आम्हालाच माहीत हाय ।। ना आमचा असतो ठिकाणा, ना कोणता पत्ता आज इथं तर उद्या कुठं ह्याचा ना लागतो थांग पत्ता ।। तरी बी आमची कोणती तक्रार नाय,, एकच म्हणणं, तुम्ही आम्हा 'धनगरां' सोबत जे वागता ते बर नाय ।। येतो आम्ही दोन दिस तुमच्या गावा फक्त तेवढं आम्हाला सुखाने राहू देत जावा ।। आज असती आमची ' राणी अहिल्याबाई' तिनं अस गावोगाव कधी फिरू दिल नसत, बाई ।। आम्ही आहोत माणसं दादा, एवढं ठेवा ध्यानात पुढल्या वेळेला येईन तेव्हा आमच्यासाठी जागा ठेवा तुमच्या मनात ।। स्वाभिमान आमचा अजून हाय जागा उगी लागत नाही आम्ही कुणाच्या बी मागा ।। - ©✍️ पूजा डोमाळे (राणू) #कविता #धनगर #भटकंती #yqmarathi