Nojoto: Largest Storytelling Platform

आई आईची वेडी माया, देते उन्हामध्ये छाया... का


आई
आईची वेडी माया,
    देते उन्हामध्ये छाया...
काय लिहु तीच्यावरी,
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी....

जन्म मला देऊन,
आनंद तिला झाला....
बोट धरुनी शिकवले,
तिने मला चालवया....

भूक लागली मला जेव्हा,
भरविला घास तिने तेव्हा. . 
स्वतः राहुनी उपाशी,
स्वप्न पूर्ण केली रे पिलांची...
तिच्या ममतेची काय सांगू कहाणी,
ती आहे माता ,तीच जगतजनानी...

ऐकून तिची अंगाई,
मन शांत निजी जाई...
विसरुनी साऱ्या दुःखाला,
शांती मिळते मनाला...
तिच्या उपकाराची काय दाखऊ काया,
तिच्या अंतकर्णात आहे, धागाएवढी  माया...

आई आज तुला, सांगावेसे वाटते ग,
जर नसती तू,तर मिपण नसते ग...
माझे अस्तत्व सुरू झाले तुझ्यामुळे,
तुझ्या ममतेचे काय उदाहरण देऊ जगापुढे...
हाथ जोडुनी प्रार्थना करते देवाला,
साती जन्मी हीच आई देरे देवा मला..

©Priyanka Jaiswal
  #आई