Nojoto: Largest Storytelling Platform

पिवळी जास्वंद... काळा भुंगा मोहित झाला पिवळ्या प

 पिवळी जास्वंद...

काळा भुंगा मोहित झाला
पिवळ्या पुष्पा वरती
नकळत गुंजन करू लागला
फिरू लागला भोवती.

पुष्पाला ते आवडलं नाही
तिने मान मुरडली
भुंग्याची पार दैना झाली
गंगा- यमुना वाहू लागली.

भुंग्याने गुंजन बंद केले
निशब्द तो होऊ लागला
जास्वंदीला आठवताना
निनाद स्वर तो गाऊ लागला.

मधाची गोडी त्याच्या मुखात आहे
सुंदर रूप तिचं डोळ्यात आहे
अश्रू आले गेले तरी!
जास्वंदी त्याच्या मनात आहे.

एक दिवसाची जास्वंद
क्षणिक तिची सुंदरता
एकदा डोळ्यांनी पाहिली, तरी ती
चिरंतर मनात दरवळत राहिली. पिवळी जास्वंद
#bestmarathiquotes 
#yqtaai 
#love 
#flower 
#yqbaba 
#poem 
#marathikavita
 पिवळी जास्वंद...

काळा भुंगा मोहित झाला
पिवळ्या पुष्पा वरती
नकळत गुंजन करू लागला
फिरू लागला भोवती.

पुष्पाला ते आवडलं नाही
तिने मान मुरडली
भुंग्याची पार दैना झाली
गंगा- यमुना वाहू लागली.

भुंग्याने गुंजन बंद केले
निशब्द तो होऊ लागला
जास्वंदीला आठवताना
निनाद स्वर तो गाऊ लागला.

मधाची गोडी त्याच्या मुखात आहे
सुंदर रूप तिचं डोळ्यात आहे
अश्रू आले गेले तरी!
जास्वंदी त्याच्या मनात आहे.

एक दिवसाची जास्वंद
क्षणिक तिची सुंदरता
एकदा डोळ्यांनी पाहिली, तरी ती
चिरंतर मनात दरवळत राहिली. पिवळी जास्वंद
#bestmarathiquotes 
#yqtaai 
#love 
#flower 
#yqbaba 
#poem 
#marathikavita