Nojoto: Largest Storytelling Platform

खोडलेल्या बोलक्या ओळी...दै.स्वतंत्र भारत

       स्वतःसाठी कधी प्रेम पत्र लिहिली नाही. पण खूप मित्राना प्रेम पत्र लिहून दिली. साले गच्ची धरून पत्र लिहून घ्यायचे.तू लई झ्याक लिहितो म्हणायचे. माझ्या अवांतर वाचनाचा हा प्रभाव असेल. उपमा,प्रतिमा,अलंकार तेव्हा काही कळत नव्हतं. कौतुक केलं की या गोष्टी ओघाने येतात. आपल्यातला कवी ,लेखक नकळत त्या वयात घडत होता. हे आता कळतंय मात्र. माझं भाषिक कौशल्य प्रेमपत्रातूनच विकसित झालं. प्रेमपत्र लिहिणे ही काही साधीसोपी गोष्ट नाही. त्यालाही दांडगा अभ्यास लागतो. खोडलेल्या ओळी सुद्धा किती बोलक्या आणि महत्वाच्या असतात. मुद्दाम कुणी खोडत नाही म्हणून त्या सुद्धा वाचायचं आपण सोडत नाही. मनाचा तळ शोधायचा असेल तर या खोडलेल्या ओळी वाचायला हव्यात. न बोलता येण्याऱ्या बऱ्याच गोष्टी खोडलेल्या ओळीत आपलं अंग झाकून असतात. रूप पाहता लोचनी तसे मन पहावे वाचनी. अक्षरांची लयदार वळणे प्रेयसीची देहबोलीच. काना,मात्रा,उकार ,वेलांटी, या तिच्या भावावस्था.पत्राच्या शेवटी रंगवलेलं लाल बदामाचं चिन्हं आणि त्याला भेदून जाणारा बाण. एवढीच काय ती प्रेमाची शान होती. आताच्या काळासारखे तेव्हा मोबाईल नव्हते. आता फोन ,मेसेज आला की मोबाईल व्हायब्रेट होतो.तेव्हा प्रेमपत्र आलं की आख्खं काळीज व्हायब्रेट व्हायचं          
     लपून छपून चिठ्ठ्या वाचण्याची मजाच वेगळी. उत्तरादाखल तिकडून आलेल्या चिठ्ठ्या वाचायला आम्ही कालिकादेवीच्या ओहळात खडकावर जावून बसायचो. एक जण मोठयाने वाचायचा बाकी सर्व गंभीर होवून ऐकत असत. गंभीर होण्यासारखं काही नसायचंच त्यात तरीही कोर्टाकडून आलेली नोटीस वाचताना जी अवस्था होते अगदी तसेच फील व्हायचे. गाण्याने बिडीची थोटकं आणलेली असायची सोबत. ती पितापिता आम्ही खडकावर आडवे व्हायचो. आभाळाकडे डोळे लावून काय उत्तर द्यायचं याचा गहन विचार करायचो. अर्थात प्रेमपत्र ही किती प्रायव्हेट गोष्ट असते. चारचौघात ती बोलायला नकोच. पण पोटात आणि होटात न राहणारी प्रेम ही स्पोटक गोष्ट असते. जगावेगळं काहीतरी केल्याचं रम्य भाण फक्त प्रेमातच अनुभवायला मिळतं. आपली प्रेमपत्र अशी चारचौघात वाचली जातात हे तिला कळालं असतं तर तिने परत कधीच प्रेमपत्रे लिहिली नसती. गण्याची प्रेयसी मळ्यात राहायची. तिचा मळा डोंगरालगत. भेटायला ये म्हणून तीनं पत्रात तुनतुनं लावलेलं. कुणाला सोबत आणू नको असंही लिहिलेलं. म्हणून विषय गहन होता. हा डरफोख. कारण तोवर शहारुख खानचा डर सिनेमा आलेला नव्हता. तो बघितला असता तर याच्यात डेरिंग आली असती. चित्रपटाचा खूप प्रभाव मधल्या काळातल्या पिढीवर होता. जान तेरे नाम, आशिकी, दिल है के मानता नाही या चित्रपटांची पदड्यावर धूम होती. रेडिओच्या विविधभारतीवर, दूरदर्शनच्या छायासंगीतात याच चित्रपटाची गाणी लागायची. पोराटोरांची हेअरस्टाईल बदलली होती बाईसारखा मधून भांग पाडायची नवी फ्यशन आली होती. न्हाव्याचा धंदा तेजीत होता. आलीय थेटरला तीन रुपये तिकीट,पुढे मागे कुठेही बसा. पत्र्याचं साधं थेटर.पत्रे दिसू नये म्हणून बारदान शिवून लावलेलं. पावसाळ्यात वरतून साप अंगावर पडल्याचे किस्से कायम चर्चेत असायचे. म्हणून तीही दहशत. थेटरात देशीदारूचा आणि बिडयांचा भकाभका वास यायचा. थेटरात येणारा प्रत्येक जण हिरोसारखाचं एन्ट्री मारायचा. व्हिलन कोणी नव्हतंच. कधी कधी पिक्चर रंगात आलेला असताना थेटरात तुफान हाणामारी व्हायची. राडा झाला, राडा झाला म्हणत लोक थेटर सोडून पळायचे. मग दरवाजावर तिकीट जमा करणारा धष्टपुष्ठ गडी ब्यटरी घेवून भ्यांचोड ,मादरचोद शिव्या हासडत यायचा. आणि हाणामारी थांबायची. बरेच लोक घाबरून निघून गेल्याने बसायला जागा मिळायची. मग मनसोक्त पिक्चर पाहून व्हायचा. जितेंद्रचा हिंमतवाला मी इथेच पाहिलान गंगाभाऊ सोबत. तेव्हाच्या हिरोत जितेंद्र चिकना हिरो होता. गंगाभाऊ आत्याचा मुलगा. तो मुंबईला असायचा.तीन चार महिन्यातून गावी यायचा. त्याचं राहणीमान हिरोसारखंच. त्याच्याकडं दहाविसाच्या कोऱ्या नोटा असायच्या. तो मुंबईत काय करतो हे आम्हाला कुणालाच माहित नव्हतं. पण तो लई श्रीमंत आहे असा आमचा समज होता. तो आला कि आमची चंगळ व्हायची. तो असे पर्यंत आम्ही रोज पिक्चर बघायचो. गाण्याचं घर थेटरच्या बाजूलाच. आम्हीही सोबत खूप पिक्चर बघितले. तिकीट फाडणारा त्याच्या ओळखीचा.तो आम्हाला गर्दी नसली की फुकट सोडायचा. सोडलं नाही की आम्ही बाहेर डॉयलॉग ऐकत बसायचो. अशी दोस्ती,यारी असल्यामुळे मला त्याला चिट्ठी लिहून द्यावी लागायची. गोपी हा आमचा शाळाबाह्य मित्र. त्याचं एका सुंदर मुली सोबत प्रकरण सुरु होतं म्हणून तो आमचा दोस्त झालेला. त्याचं प्रेमप्रकरण जुनं असल्यामुळं तो सिनिअर. त्याची गाईड लाईन घ्यायची असं ठरलं. गोपी हॉटेलात काम करायचा. बुटका पण दिसायला देखणा होता.त्याची प्रेयसीही देखणी होती पण नापास झाल्यामुळे ती घरीच होती. तिच्या घरामागं याचं घर. दोघांचं प्रकरण आम्ही सोडलं तर कुणालाच माहित नव्हतं. तो गण्याच्या सोबत जायला तयार झाला. यानं पांदीत झाडा आड लपायचं आणि तिला एकटेच आलोय असं सांगायचं असं ठरलं. ठरल्या प्रमाणे हे भेटून आले. दुसऱ्या दिवशी तिची चिठ्ठी आली. त्यात तने लिहिले होते, ‘तू मला पहायला येतो कि डोंगर बघायला. मला बघायचं सोडून सारखा सारखा डोंगराकडेच काय बघत होतास म्हणून. मला काही याचा अर्थ कळेना. मग लक्षात आलं ,गोपी लपला त्या झाडाकडे याचं लक्ष.तो आहे की गेला म्हणून हा सारखा तिकडे बघत होता.
         प्रेमपत्र लिहिण्यासाठी मला खरं खाद्य मिळालं त्याचाही एक इतिहास आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या.बकऱ्या चरायला सोडून मी बोरीखाली चांदोबा वाचत बसायचो. मळया जवळ नवीनच एक कॉलणी झाली होती. बकऱ्या तिकडे जावून त्यांच्या गार्डन मधल्या झाडांची शेंडे खात. मग बंगल्यावाले ओरडत.म्हणून सारखं शेळ्यांवर लक्ष ठेवावं लागत. बंगल्या जवळ शेळ्या गेल्या की मी त्या लांब हाकलून येत. एकदा असंच वाचता वाचता हाकलायला गेलो. एका बंगल्या मागे फेकलेल्या कचऱ्यात आणि आजूबाजूला खूप घडी घातलेली कागदं पडलेली. मी सहज एक उचकून पाहिलं तर सुंदर अक्षरात लिहिलेले ते फुलस्केपचे तीनचार कागदं होते. मी इकडेतिकडे पाहून ते पटकन खिशात घातलं आणि पळतच घरी आलो.मोठ्या भावाला दाखवलं त्यानं वाचलं अन म्हटला पळ काहीही उचलून आणतो,अन त्यानं ते खिशात घातलं नंतर त्याला गुपचूप ते पत्र वाचताना पाहिलं. मला का वाचू दिलं नाही याने. काय होतं त्यात म्हणून मला उत्सुकता लागून राहिली. मग मी परत जावून एक घडी घातलेला कागद उचलून आणला. आमच्याकडे जुन्या काळातली एक लोखंडी टाकी होती तिच्यात बसून वाचून काढलं तर ते प्रेमपत्र होतं. कॉलनीत एक नवीन गृहस्त राहायला आले होते त्यांच्या मुलीला एका मुलाने लिहिलेली ती पत्रे होती. वाचून झाली की ती मागे फेकून द्यायची. मला तिचा तेव्हा खूप राग आला. बिचारा तिचा प्रियकर किती प्रेमाने एवढी तीनचार पाने पत्र लिहितो आणि हि खुशाल फुकून देते.गाण्याने,गोप्याने अजून चिठ्ठ्या जपून ठेवल्याय.मुलं किती मनस्वी प्रेम करतात. चिठ्ठ्या अशा फेकून देणे म्हणजे प्रेमाचा अपमानच वैगरे. नंतर एक एक करून मी सर्व चिठ्ठ्या वाचून काढल्या. त्या सर्व प्रियकराने लिहिलेल्या होत्या. हीने काय लिहिले असेल उत्तर म्हणून हे मी मनातल्या मन

nojotouser6882375737

vishnu thore

New Creator