*टीचभर पोटासाठी* *चालं धावा धाव सारी* *घडीभर ना इसवा* *फरफट पाठमोरी* *किती करावा सायास?* *किती जोडावी ठिगळं?* *जरी वाटतं सांधलं* *परी फाटकं आभाळ* *पीठा-मीठाचाचं घोर* *रोजं तजवीज नवी* *शेणा-मातीत राबती* *पसां भाकरी त्या हवी* *लुगडं फाटकं मायेचं* *बा ची उसवली बंडी* *झोपडीत मुक्कामाला* *ऊन, पाऊस नी थंडी* *कुठं लपलास देवा?* *का रं गेलास तिष्ठूण?* *दिन-दुबळ्यांच्या माथी* *कोरी होरपळीचं गोंदण* *कोंडमारा हा जलमाचा* *घालमेल अंतरीची* *कधी येईल अंगणी* *सुखी सर चांदण्याची* ©Shankar kamble #जीवन #जगणंकसंअसावं #वास्तव # #humantouch