तक्रारी शिवाय काही जीवन जगता येत नाही, कितीही प्रयत्न करा तक्रार काही आपला पिच्छा सोडत नाही. लहान असता आई कडे शेजारच्या पाजाऱ्यांची तक्रार, शाळेत गेलो असता वडिलांकडे शिक्षकांची तक्रार. थोडे मोठे झालो तर प्रेमात ती ची तक्रार, कामावर गेलो असता बॉस ची तक्रार. घरात ह्या ना त्या कारणावरून बहिणीची तक्रार, मंडळात कमी पैस्यांची पावती फाडतो म्हणून त्यांची तक्रार. लग्न झाल्यावर हातभार लावत नाही म्हणत बायकोची तक्रार, मुलंबाळं हट्ट पुरवत नाही म्हणत त्यांची ही तक्रार. फक्त एकच व्यक्ती अशी जीने आपल्याकडे एक ही तक्रार न मांडली, ती म्हणजे आपली माऊली,आपल्या अनंत चुका जी पदरात घाली. लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार #तक्रार1