का कोणास ठाऊक पण सतत एक भीती असते मनात जे मला तिच्यासाठी वाटते ते असेल का तिच्याही मनात बोलु कि नको सांगु का तिला मनातलं सर्व काही आज काय विचार करेल ती म्हणून मन धास्तावतं माझं आज काय ठाऊक कशी कळेल तिला या जीवाची घालमेल मनात माझ्या सतत चाले तिच्याच विचारांची रेलचेल दिसाची रात रातीचा दिस तिच्याच विचारात बुडतो तिला आपलसं करण्याकरता जिव कसा तडफडतो वागण्या बोलण्यात तिच्या सांगु आहेत किती तऱ्हा तिला प्रपोज करण्यासाठी देवा मला बळ दे रे जरा... ©Mangesh Kankonkar भीती प्रपोजची...